पोलीसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाईची पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

पोलीसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाईची पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी

पोलीसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाईची पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी
बारामती: दिनांक १४/१२/२०२० रोजी इंदापूर तालुक्यामध्ये अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांची चौकशी करीत असतांना, पोलीस कर्मचारी यांनाच मारहाण करण्यात आली. सदरील वाळु माफिया यांच्यावर गुन्हा दाखल झालेला
असुन, योग्य ती कारवाई आणि तपास देखील सुरू आहे.पोलीस बॉइजचे संस्थापक अध्यक्ष श्री.रवि ना. वैद्य यांच्यासह प्रदेशाध्यक्ष विकास सुसर तसेच सोलापूर जिल्हयाचे अध्यक्ष श्री.रोहित ओंबासे, पुणे कार्याध्यक्ष आरीफ शेख यांच्या मार्गदर्शनाने तसेच संजय ( नाना) दराडे
अध्यक्ष बारामती शहर यांनी 'पोलीस बॉईज असोसिएशन बारामती' तर्फे निवेदन आणि तक्रारी अर्ज मा.पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बारामती, तसेच मा.उपविभागीय अधिकारी उपविभाग बारामती यांना देण्यात आले. सदरील वाळु माफियांचा पुणे जिल्हयामध्ये हाहाकार माजलेला असुन, बळाच्या व पैशाच्या जीवावर कोणासही न घाबरता सदरील बेकायदेशीर धंदा जोरात चालू झालेला दिसत आहे. पोलीस कर्मचाऱ्यास देखील न जुमानता सदरील वाळु माफिया हे बेकायदेशीररित्या पोलीसांवरती हात
उचलुन महाराष्ट्र पोलीस अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी व वृंद यांचा अपमान करून बदनामी करीत आहेत. सदर घडणारा प्रकार हा गांभीर्याने घेण्याजोगा असल्या कारणाने निवेदनात म्हटले आहे की, सदरील
गुन्हयाची चौकशी होवुन त्यामध्ये वाढीव कलम घेवुन कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचाऱ्यां वरती होणाऱ्या अन्यायास आणि सदरील अरेरावीस आळा बसावा या करिता बॉईज असोसिएशन बारामतीच्या वतीने निवेदन
देण्यात आले.या प्रसंगी बॉईज असोसिएशनचे बारामती शहर अध्यक्ष संजय ( नाना) दराडे, शुभम भंडारे, ओंकार दराडे,साजन अडसुळ, अमोल बिनवडे, करण नवले, अनिकेत वणवे, अॅड.मेघराज नालदे, अॅड.ओंकार इंगुले हे सर्व
पदाधिकारी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment