सख्ख्या तीन बहिणीचा मृत्यू,विषबाधा झाल्याचा अंदाज... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, December 18, 2020

सख्ख्या तीन बहिणीचा मृत्यू,विषबाधा झाल्याचा अंदाज...

सख्ख्या तीन बहिणीचा मृत्यू,विषबाधा झाल्याचा अंदाज...
कराड (प्रतिनिधी):-तालुक्यातील सैदापूर  गावातील तीन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.अन्नातून विषबाधा झाल्याचं बोललं जात आहे.आस्था शिवानंद सासवे (वय-9), आरुषी शिवानंद सासवे (वय-8) आणि आयुषी शिवानंद सासवे(वय-3) अशी मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत.  माहिती अशी की, सासवे कुटुंबानं गुरुवारी रात्री एकत्रित जेवण केलं. त्यानंतर आईसह
या आयुषी, आस्था आणि आरुषी या तिन्ही
बहिणींना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला.यानंतर तीन मुलींची प्रकृती खालावल्यानं त्यांना कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू झाला.मुलींच्या आईची प्रकृती आता स्थीर आहे. या घटनेनंतर सासवे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.मृत्यू झालेल्या मुलींचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी दिलेली माहिती अशी की, तिन्ही मुलांना अन्नातून विषबाधा झाली असावी, त्यातूनच तिघींचा मृत्यू झाला असावा,असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे.या गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment