पत्रकारांचा समावेश करण्याची मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्र्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, December 15, 2020

पत्रकारांचा समावेश करण्याची मुख्यमंत्री ,आरोग्यमंत्र्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची

पत्रकारांचा समावेश करण्याची मुख्यमंत्री,
आरोग्यमंत्र्याकडे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मागणी..                                                मुंबई :- कोरोनाचा प्रसार कमी होत चालला असताना राज्यात लसीकरणाची तयारी जोरदार सुरु आहे. राज्यातील कोविड लसीकरणाचा मेगाप्लान राज्य सरकारने तयार केला असून
ही बाब अभिनंदनीय आहे.राज्यात लसीकरणासाठी राज्य,जिल्हा आणि स्थानिक
पातळीवर वेगवेगळ्या समित्यांचे / टास्क फोर्सचं गठन करण्यात आलं आहे.तसेच, राज्य पातळीवर लसीकरण मोहिमेसाठी कंट्रोल रुमही तयार करण्यात आली आहे.जिल्हा पातळीवर अतिरिक्त आयुक्तांच्या अंतर्गत शहरांमधील
टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आलीय. स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत वॉर्ड टास्क फोर्सची निर्मिती करण्यात
निती आयोगाअंतर्गत कोविड १९ लसीकरणासाठी प्रशासनातील राष्ट्रीय तज्ञ गटही केंद्र स्तरावरील समिती देशभरातील लसीकरण
कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहे.लसीकरणाबाबतच्या महत्वाच्या निर्णयाचे आणि पॉलिसी ठरवण्याचे अधिकार या केंद्रीय स्तरावरील समितीला देण्यात आल्याची माहिती
आम्हाला उपलब्ध झाली आहे.तीन टण्प्यांमध्ये ही लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.दुसर्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणजेच पोलिस, फायर ब्रिगेड, सफाई कर्मचारी,महापालिका कर्मचारी यांचा समावेश असल्याची माहीती आहे. आणि तिसर्या टप्प्यात ५० वर्षांवरील नागरिक आणि
कोमॉर्बिड व्यक्तींचा समावेश
के ल्याचे समजते., कोरोना
महामारीत सर्वच पत्रकारांनी काम केले आहे. आरोग्य कर्मचारी,पोलिस यांच्या जोडीने पत्रकारांनी देखील जीवाची पर्वा न करता
काम केले आहे. यामुळे काही
पत्रकारांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पत्रकार देखील फ्रंटलाईन वर्कर म्हणून या काळात होते आणि आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या दुसर्या टप्प्यात पत्रकारांचा देखील समावेश करण्यात यावा आणि पत्रकारांचेही
लसीकरण दुसर्या टप्प्यातच करण्यात यावे अशी आम्ही मागणी करत आहोत.मागणीचा योग्य तो विचार व्हावा आणि पत्रकारांचे लसीकरण दुसर्या टप्प्यातच करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंढे.राज्य संघटक संजय भोकरे,कार्यध्यक्ष टोळ्ये,कि रण जोशी,राज्य
सरचिटणीस विश्रुवास आरोटे,प्रदेश प्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव आदींनी निवेदना द्वारे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांचेकडे केली आहे.

No comments:

Post a Comment