बारामतीत सम्राट अशोका जयंती उत्साहात.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 17, 2024

बारामतीत सम्राट अशोका जयंती उत्साहात..

बारामतीत सम्राट अशोका जयंती उत्साहात.. 
बारामती:- शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे चक्रवर्ती सम्राट अशोका यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी माजी विरोधी पक्षनेते आणि बौद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष ॲड.विजय गव्हाळे यांच्या हस्ते सम्राट अशोका यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे आणि शुभम अहिवळे यांनी सम्राट अशोका यांच्या क्रांतिकारी कार्याचा आढावा घेत.उपस्थितींना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी,माजी नगरसेवक गणेश सोनवणे,ॲड.सुशिल अहिवळे,काळुराम चौधरी,गौतम शिंदे,गजानन गायकवाड,बबलू जगताप,विश्वास लोंढे,सोमनाथ रणदिवे,चंद्रकांत भोसले,कैलास शिंदे,चेतन साबळे,किरण भोसले,अरुण कांबळे,विजय जगताप,बंटी गायकवाड,अक्षय माने,निवृत्ती गोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment